Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘आमची कर्जे बघूनच ‘ईडी’ आश्चर्यचकित होईल’- संजय पाटील
![‘ED will be surprised to see our debts’ - Sanjay Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/sanjay-patil.jpg)
सांगली |
आपण भाजपचे खासदार असून ईडी आपल्या मागे लागणार नाही. मात्र, आमची कर्जे बघूनच ईडी आश्चर्यचकित होईल असे विधान खा. संजय पाटील यांनी विटा येथे केले. विटा येथे एका कार्यक्रमात खासदार पाटील यांच्यासह आमदार अनिल बाबर, वैभव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना खा. पाटील म्हणाले, सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आमच्या मागे लागणे शक्यच नाही. कारण आपण भाजपचे खासदार आहोत. मात्र जर चौकशीची वेळ ईडीवर आलीच तर आमची कर्जे बघून आश्चर्यचकित होऊन ही माणसं आहेत की अन्य कोणी असा सवाल खुद्द ईडीच करेल. आम्ही दिखाऊपणासाठी चाळीस चाळीस लाखांच्या मोटारी वापरतो. जर महागडय़ा मोटारी वापरल्या नाहीत, तर लोकच आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील, असेही ते म्हणाले.