येत्या १५ ऑक्टोबरपासून शिर्डीतून दिल्ली, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू
![Flights from Shirdi to Delhi and Hyderabad will start from October 15](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/shirdi_airport.jpg)
शिर्डी – देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईसमाधी मंदिर ऑक्टोबरमध्ये दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यानंतर लगेच भाविकांसाठी विमानसेवाही सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीतर्फे येत्या १५ ऑक्टोबरपासून शिर्डी-हैदराबाद आणि शिर्डी-नवी दिल्ली अशी दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
राज्य सरकारने नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिर्डीचे साई मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगो कंपनीने ही दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी आपली विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिकीट बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. या विमानसेवेचा लाभ देशातील उत्तर आणि दक्षिण भागातील भाविकांना होणार आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केल्याने शिर्डीतील विमानसेवा आतापर्यंत बंद होती. ती आता पुन्हा सुरू होणार आहे.