ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी हिंजवडी येथील एकजण अटकेत
पिंपरी चिंचवड | विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी हिंजवडी येथून एकाला अवैध धंदे कारवाई पथकाने अटक केली आहे. हिंजवडी फेज 2 येथून गुरुवारी (दि.16) आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.राकेश कमलाशंकर पांडे (वय 43, शिवतेज नगर, हिंजवडी, ता. मुळशी) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विक्रीसाठी 13 हजार किंमतीचा 460 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता. दरम्यान, आरोपी एका पान शॉप जवळ संशयित रित्या थांबला असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले तथापी, झडती घेतली असता त्याच्याजवळ गांजा असल्याचे पथकास निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गांजा व एक मोबाईल असा 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.