ओम शिव मित्र मंडळाने जपला सामाजिक कार्याचा वसा : राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार
![Om Shiv Mitra Mandal cherishes the fat of social work: NCP youth leader Sandeep Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/sandeep-pawar-pcmc.jpeg)
ताथवडे येथे मंडळाच्या रक्तदान शिबिराचे पवार यांच्या हस्ते उद्धाटन
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत होता. त्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून देखील वारंवार करण्यात येत होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक मंडळे पुढे आली आहेत. ओम शिव मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील रक्तदान शिबिर आयोजित करून मोलाचे सामाजिक कार्य उभा केले आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आणखी एक आदर्श निर्माण केला आहे, असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी केले.
ओम शिव मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पवार, उद्योजक रोशनकुमार चौधरी, युवराज सोनवणे, रोहित कडेकर, राजू मिडगुले, अजय घुगे, सौरभ सत्याळ, अभिजित कोरडे, सुरज भोकसे, प्रतीक सत्याळ, अभिजित तलावर, यश भंडारे, ओंकार शिंदे, प्रथमेश गुंडगळ, मल्हारी भोकसे, आदित्य पांढारे, सुदर्शन राठोड, अथर्व शिवले, हनुमंत भोकसे उपस्थित होते.
संदीप पवार म्हणाले की, ओम शिव मित्र मंडळ सातत्याने सामाजिक कामात पुढे असते. त्या अनेक कामांपैकी रक्तदान शिबिराची देखील भर पडली. कोरोना काळात तुटवडा पडू नये या साठी शहरातील मंडळांकडून रक्तदान शिबिर घेणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून व नियमांचे पालन करून कोरोना सारख्या संकटातुन बाहेर पडू, असे पवार म्हणाले.