Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यातून सतरा वर्षांच्या तीन तरुणी बेपत्ता, अज्ञात इसमांनी पळवून नेल्याचा संशय
![It is suspected that three 17-year-old girls went missing from Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/26bdadd6-4c4c-4391-baee-ee7044af4efa.jpg)
पुणे – पुणे शहरातील खडक, सिंहगड रस्ता आणि चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून सतरा वर्षे वयाच्या तीन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. संबंधित पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरातील सतरा वर्षे वयाची मुलगी शिवाजीनगर येथील तिच्या मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली ती अद्याप घरी परत आलीच नाही. तिच्या पालकांनी याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
अशाच प्रकारच्या घटना सिंहगड रस्ता आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील घडल्या आहेत. सानिया आणि अंजली नामक अल्पवयीन तरुणीस अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.