देशात 24 तासांत 42,766 नवे कोरोना रुग्ण, 308 मृत्यू
पुणे | देशातील कोरोना रुग्णवाढ 42 हजारांवर स्थिरावली आहे. गेल्या 24 तासांत 42 हजार 766 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या केरळमध्ये 29 हजार 682 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 29 लाख 88 हजार 673 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 21 लाख 38 हजार 092 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 38 हजार 091 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात सध्या 4 लाख 10 हजार 048 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 40 हजार 533 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.42 टक्के एवढा झाला आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 53 कोटी 58 हजार 218 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 47 हजार 476 नमूने तपासण्यात आले आहेत.लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 68 कोटी 37 लाख 29 हजार 058 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यापैकी 15 कोटी 99 लाख 16 हजार 790 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असून, 52 कोटी 38 लाख 12 हजार 268 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.





