मंदिरे उघडण्यासाठी सांगलीत भाजपचा घंटानाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/p.mh-1-4.jpg)
सांगली |
मंदिराचे दरवाजे उघडावेत या मागणीसाठी सोमवारी सांगलीतील गणेश मंदिरासमोर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने घंटानाद करण्यात आला. अन्य राज्यात मंदिरे उघडली असताना महाराष्ट्रामध्येच करोना प्रसाराच्या भयाने मंदिरे बंद ठेवून राज्य शासन मंदिरांवर अवलंबून असलेल्या कुटुंबावर अन्याय करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. गेल्या पाच महिन्यापासून राज्यातील मंदिरे ठाकरे सरकारने बंद ठेवली आहेत.
मात्र, मद्यालये, बाजारामधील व्यवहार नित्याप्रमाणे सुरू आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली मंदिरे बंद ठेवल्यामुळे भाविकांना मानसिक स्वास्थ्य मिळविण्यात अडथळे येत आहेत. ही मंदिरे तत्काळ खुली करावीत, या मागणीसाठी गणेश मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अजयकुमार वाले यांनी निवेदनही दिले. या आंदोलनामध्ये आ. सुधीर गाडगीळ, नीता केळकर, शहर जिल्हाध्यक्ष दीपक िशदे, नितीन िशदे, निशिकांत शेटे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेविका अॅड. स्वाती िशदे, पृथ्वीराज पवार, गौतम पवार आदी सहभागी झाले होते.