breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गोकुळ अष्टमीनिमित्त देशी-विदेशी फळाफुलांची सजावट
पंढरपूर – येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज गोकुळ अष्टमीनिमित्त ५०० किलो विविध फळांसह २ हजार किलो देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हवेली येथील भाविक पांडुरंग मोरे यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे. फळाफुलांच्या सजावटीने देव नटला आहे.
देवाचा गाभारा, प्रवेश द्वार, सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. झेंडू, आर्किड, कारनेशियन, शेवंती, कामिनी, गुलाब, आष्टर, जिप्सोफेलिया, तुळस, गड्डी फुले आशा २ हजार किलो देशी-विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करून मंदिर सजवण्यात आले आहे. तर मोसंबी, सफरचंद, अननस, सिताफळ, कलिंगड, संत्री अशा ५०० किलो फळांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे. रंगबेरंगी फुले आणि विविध फळांच्या सजावटीमुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.