‘राज्याची भविष्यातील संपत्ती’; बलात्काराचा आरोप असलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्याला मिळाला जामीन
![Shocking! The incident took place when the victim's daughter became pregnant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/rape_clipart.jpg)
नवी दिल्ली |
गुवाहाटी उच्च न्यायालयाने आयआयटी-गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला सोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपासाठी जामीन मंजूर केला आहे आणि या दोघांचे वर्णन राज्याची भविष्यातील संपत्ती असे केले आहे. बी.टेक करत असलेल्या विद्यार्थ्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना सर्व पुराव्यांच्या आधारे याचिकाकर्त्याविरुद्ध प्रथमदर्शनी प्रथमदर्शनी प्रकरण स्पष्ट आहे असे न्यायमूर्ती अजित बोरठाकूर यांनी म्हटले आहे. “या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे आणि माहिती देणारी/पीडित मुलगी आणि आरोपी, आयआयटी, गुवाहाटी येथे तंत्रज्ञानाचा कोर्स करणारे गुणवंत विद्यार्थी असल्याने, राज्याची भविष्यातील संपत्ती आहेत. जर आरोप ठरवून केले गेले असतील तर आरोपीला कोठडीत ठेवणे आवश्यक असू शकत नाही,” असे आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने १३ ऑगस्टच्या आदेशात म्हटले आहे की, दोघेही १९ ते २१ वयोगटातील तरुण आहेत आणि ते दोघेही वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. “आरोपपत्रात नमूद केलेल्या साक्षीदारांच्या यादी तपासून पाहिल्यावर, आरोपी जामिनावर सुटल्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर प्रभाव पाडण्याची शक्यता दिसत नाही,” असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, “हे नमूद करणे योग्य आहे की जामीन अर्जावर काम करताना न्यायालयाला आरोपींविरुद्ध उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या गुणवत्तेवर किंवा दोषांवर चर्चा करण्यासाठी बोलावले जात नाही. पण जामीन मंजूर करताना प्रथमदर्शनी निष्कर्ष काढण्याची काही कारणे थोडक्यात दर्शविली पाहिजेत.” उच्च न्यायालयाने आरोपीला ३० हजार रुपयांच्या जामिनावर आणि दोन जामिनदारांवर जामीन दिला आहे. विद्यार्थ्यावर असा आरोप आहे २८ मार्चच्या रात्री आरोपीने मुलीवर बलात्कार केला होता. दुसऱ्या दिवशी मुलील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ३ एप्रिल रोजी अटक केली.