ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड | तरुणाने महिलेचा सतत पाठलाग केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री पिंपरी परिसरात घडली.राहुल प्रकाश गायकवाड (वय 27, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा सतत पाठलाग केला. तसेच रविवारी फिर्यादीच्या घराचा दरवाजा वाजवला. फिर्यादी घराबाहेर आल्या असता आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच शरीर सुखाची मागणी करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.