गेल्या 24 तासांत 32,937 नवे कोरोना रुग्ण, 35,909 जणांना डिस्चार्ज
![32,937 new corona patients, 35,909 discharged in last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/383720-corona-logo-1-1.jpg)
पिंपरी चिंचवड | भारतात गेल्या 24 तासांत 32 हजार 937 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 35 हजार 909 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 14 लाख 11 हजार 924 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 22 लाख 25 हजार 513 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 81 हजार 947 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारतात आजवर 4 लाख 31 हजार 642 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 417 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.45 टक्के एवढा आहे.
देशात आजवर 49 कोटी 48 लाख 05 हजार 652 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 11 लाख 81 हजार 212 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 53 कोटी 58 लाख 57 हजार 108 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 17 लाख 43 हजार 114 जणांना लस टोचण्यात आली आहे.