महामार्गालगत सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका तर दोघे अटकेत
पुणे | शिरूरमध्ये लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून तीन महिलांची सुटका केली असून, दोघांना पकडले आहे.याप्रकरणी मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप व चालक पारस बस्तीमल परमार (रा. ओम साई लॉज, सरदवाडी, ता शिरूर) यांना पकडले आहे.
शिरूर तालुक्यात सरदवाडी असलेल्या ओम साई लॉजवर महिलांकडून वेश्या व्यावसायकरून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर दोघांना पकडले आहे. या कारवाईने शिरूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, माधवी देशमुख, शब्बीर पठाण, तुषार पंधारे, लता जगताप, सचिन घाडगे, जनार्धन शेळके, राजु मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, पूनम गुंड, मुकेश कदम यांनी केली आहे.