Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
मोठी बातमी ! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल
![Big news! Twelfth result tomorrow at 4 p.m.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/UP_Board_Result.jpg)
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या (मंगळवारी, दि.03) दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे यंदा बारीवीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती.
जुलैअखेर बारावीचा निकाल लागेल असे म्हटले गेले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून उद्या (मंगळावरी, 03 ऑगस्ट) दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर होत आहे.