‘डॉक्टर तुमच्या कार्याला सलाम आहे’- आमदार महेश लांडगे
- कासारवाडी येथील महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर, नर्स आणि आशा सेविकांचा सत्कार
भोसरी |
कोरोना कालावधीत स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता केवळ सेवाभावी वृत्तीने डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेतली.त्यामुळे कोरोनाला लवकरात लवकर हद्दपार करण्यात आपण यशस्वी झालो. त्यामुळे ‘डॉक्टर तुमच्या कार्याला सलाम आहे’ असे उद्गार आमदार महेश लांडगे यांनी कासारवाडी येथील कार्यक्रमात काढले.रुग्ण आणि कोरोना महामारी यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून डॉक्टर आपली सेवा बजावत होते .म्हणून आपण सुरक्षित आहोत असेही आमदार लांडगे यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने कासारवाडी येथील महापालिकेच्या दवाखान्यात डॉ.गोविंद नरके, नर्स शोभा थोरात, डॉ.पांडुरंग लांडगे, गणेश जवळकर, तसेच आशा वर्कर्स यांचा सन्मान ट्रॉफी,शाल,गुलाबपुष्प देऊन आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक माऊली थोरात, आशा शेंडगे, पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, पवना बॅंकेचे संचालक जितेंद्र लांडगे, चिटणीस देवदत्त लांडे, युवा मोर्चा सरचिटणीस गणेश जवळकर, उद्योजक बाळासाहेब जवळकर,सुधीर जवळकर,उपाध्यक्ष सुनील लांडगे, संतोष टोणगे, आप्पासाहेब धावडे, बापुसाहेब भोसले,गणेश संभेराव, रघुनाथ जवळकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर, दिगंबर शेडे, सुरेश गादिया, मुझफ्फर इनामदार आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, कोरोनाकाळ प्रत्येकासाठी परीक्षा पाहणारा होता.यामध्ये देवदूत म्हणून कोणी काम केले असते तर ते डॉक्टरांनी, त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. रुग्ण आणि कोरोना महामारी यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून डॉक्टर आपली सेवा बजावत होते .म्हणून आपण सुरक्षित आहोत अशा भावना आमदारांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश जवळकर,देवदत्त लांडे, गणेश जवळकर यांनी केले.