Breaking-newsराष्ट्रिय
कुमारस्वामींच्या शपथविधीला जमलेले विरोधक २०१९ निवडणुकांमध्ये एकत्र नसणार- देवेगौडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/karnataka-all-opposition-leaders-.jpg)
नवी दिल्ली: विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर देशातील सर्व विरोधक कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या शपथविधीला व्यासपीठावर एकत्र जमले होते.
दरम्यान, “कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित असलेले विरोधक सर्व राज्यांमध्ये एकत्र लढतील. अशी आवश्यकता नाही, असे विधान जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच.डी देवेगौडा यांनी केले आहे.
देवेगौडा पत्रकारांसोबत बोलत होते. दरम्यान, संयुक्त आघाडी सादर करताना काँग्रेस, टीएमसी, बसपा, आम आदमी पार्टी, सीपीएमचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील सर्वसाधारण निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बसपा प्रत्येक गटात ४० जागांवर चर्चा करणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.