काँग्रेसचे नेते उमाजी सनमडीकर यांचे निधन
![Congress leader Umaji Sanmadikar passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/0umaji_sanmadikar_4.jpg)
सांगली |
जतचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमाजी धानाप्पा सनमडीकर (वय ८७) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. एका सामान्य कुटुंबातील सनमडीकर यांनी सन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर पंचायत समिती सदस्यापासून सुरू केलेला राजकीय प्रवास आमदारकीपर्यंत होता. जतचे तीन वेळा त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते.
गेले चार दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पाíथव सनमडीकर रुग्णालयात सायंकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी सनमडी या मूळगावी त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
भारतीय सन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. पंचायत समितीनंतर त्यांना काँग्रेसने १९८४ मध्ये जत राखीव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यांनी ही निवडणूक जिंकून विधानसभेत प्रतिनिधित्व पटकावले. त्यानंतर १९८९ आणि १९९९ च्या निवडणुकीतही त्यांनी आमदारकी पटकावली होती. २००२ मध्ये त्यांची महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.