“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे”- अतुल भातखळकर
!["Rahul Gandhi is better than Chief Minister Uddhav Thackeray" - Atul Bhatkhalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Uddhav-Thackeray-Rahul-Gandhi-1.jpg)
मुंबई |
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांमध्ये रणनीती निश्चित करण्यात आली. दोन दिवसांचेच अधिवेशन असल्याने विरोधकांबरोबर होणारा चहापानाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला होता.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषददेखील रद्द केल्याने विरोधकांनी निशाणा साधला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे अशी टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे….” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT यांना
विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही.
१७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे… pic.twitter.com/Aq2cEjb8bn— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 4, 2021