ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
औषधे घेऊन घरी जात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला
![Snatched the mobile of a person who was going home with drugs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/mobile-chori-crime.jpg)
पिंपरी चिंचवड | औषधे घेऊन घरी जात असलेल्या एका व्यक्तीच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 30) रात्री संभाजी चौक, प्राधिकरण निगडी येथे घडली.
राजेंद्र वामन जगताप (वय 48, रा. आकुर्डी स्टेशनजवळ गुरुद्वारा चिंचवड) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास संभाजी चौक प्राधिकरण निगडी येथून आईसाठी बीपीचे औषध घेऊन घरी जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 11 हजार 999 रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.