Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
देशात ६० हजार नवे रुग्ण तर मृतांचा आकडा दीड हजारांवर
![48 thousand 698 new corona patients in the last 24 hours in the country; 1,183 corona victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/319718852-corona-1532x900-adobestock-1.jpg)
नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत ६० हजार ७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ६४७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले आकडे हे सांगत आहेत.
आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात एकूण बाधितांचा आकडा २ कोटी ९८ लाख २३ हजार ५४६ झाली आहे. यापैकी २ कोटी ८६ लाख ७८ हजार ३९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, ३ लाख ८५ हजार १३७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे सध्या देशात ७ ल ाख ६० हजार ०१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, २७ कोटी २३ लाख ८८ हजार ७८३ रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.