मुंबई तिसऱ्या टप्प्यात अनलॉक होणार, महापौरांनी केलं स्पष्ट
![Mumbai will be unlocked in the third phase, the mayor clarified](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/mumbai-mayor-kishori-pednekar-1590484505.jpg)
मुंबई – राज्यातील विविध महानगरपालिकांच्या शहरांत आणि जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा वेग मंदावत असल्याने अनलॉकची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. आयसीयू बेड्सची उपलब्धता आणि पॉझिटीव्हिटी रेटनुसार संबंधित विभाग अनलॉक करण्यात येणार आहे. यात मुंबई आता तिसऱ्या टप्प्यात अनलॉक होणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण 515 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळं मुंबई ही तिसऱ्या लेवलपर्यंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबईत तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जाती. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असंही त्या म्हणाल्या.
राज्य सरकारच्या निकषांनुसार सायंकाळी मुंबईतील व्यवहारांसाठीचं एक परिपत्रक काढण्यात येईल. तेव्हा देशाच्या आर्थिक राजधातीनील या अनलॉकचं चित्र अधिक स्पष्ट होईल अशी स्पष्टोक्ती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
विरोधकांची टीका
विरोधी पक्षाकडून लसीचं ग्लोबल टेंडर आणि इतरही नियोजनाच्या बाबतीच होणारी टीका पाहता या पक्षाकडून शब्दांचा झिम्माच सुरु आहे. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं लक्ष्य काय आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करण्यास आमचं प्राधान्य आहे, ही बाब महापौरांनी ठणकावून सांगितली. टीका करण्यापेक्षा नागरिकांच्या हिताचा विचार विरोधी पक्षानंही करावा असा आग्रही सूर यावेळी त्यांनी आळवला.