‘नैसर्गिक ऑक्सिजन’ शुध्द हवा, समाजातील प्रत्येकाची गरज – आर्यनमॅन कृष्ण प्रकाश
![‘Natural Oxygen’ Pure Air, Needed by Everyone in Society - Aryanman Krishna Prakash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/49f2a172-4f9f-4273-90e4-89c1f28d2b32.jpg)
- ध्येयवेड्या तरुणांचा स्टार्टअपमधून राज्यातील पहिलाच प्रयोग
- नासांच्या मान्यतेने ‘ऑक्सिजन’ झाडांचे होणार इनडोअर वृक्षारोपणांसह संगोपन
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना महामारीत कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. हजारो निष्पाप लोकांचे जीव ऑक्सिजनअभावी गेले. या परस्थितीत शुध्द हवा आणि नैसर्गिक ऑक्सिजन समाजातील प्रत्येक घटकाला हवा आहे. समाजाची ही गरज ओळखून ‘O2 झोन’ कंपनीने ‘ऑक्सिजन’ देणा-या झाडांचे इनडोअर वृक्षारोपणांसह संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे नैसर्गिक ‘ऑक्सिजन’ घेवून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास निश्चित मदत होईल – असे प्रतिपादन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
O2 झोन अर्बन ऑक्सीजियो सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन पोलिस आयुक्त तथा आर्यनमॅन कृष्णा प्रकाश यांचे हस्ते ऑनलाइन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, O2 झोनचे संचालक शेखर खंडागळे, सिध्दनाथ ठोकळे, सचिन वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.
नासा सारख्या संशोधन संस्थेने ऑक्सिजन देणा-या झाडांना मान्यता दिली आहे. त्या झाडांचा उपयोग करुन ‘O2 झोन’ कंपनीने इंडोर प्लॅटेशन करुन नैसर्गिक शुध्द हवा आणि ‘ऑक्सिजन’ मिळणार आहे. ही झाडे आपण घर, ऑफिस, बॅंक, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणे झाडांची लागवड करण्यात येईल. या झाडांची संपुर्ण देखभाल ही कंपनी करणार आहे. विशेषता यापुर्वीची घरामधील हवा आणि झाडांच्या लागवडीनंतर मिळणारी शुध्द हवा, याविषयी कंपनी तपासणी अहवाल देणार आहे. तसेच या कंपनीच्या माध्यमातून आपण लोकांना लागणारा ऑक्सिजन, स्वच्छ हवा, याविषयी संपुर्ण माहिती देवून इनडोअर प्लॅटेशन कसे करावे, याकरिता आम्ही काम करणार आहोत.
देशासह राज्यात नासाने मान्य केलेल्या ऑक्सिजन देणा-या झाडांचे वृक्षारोपण व संगोपन करणारी ही एकमेव कंपनी आहे. इनडोअर प्लॅटेशन करुन प्रत्येक झाडांची ओळख, ते झाड कुठे लावायचे, त्याची निगा कशी ठेवायची, याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहे. सध्यस्थिती ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आपण नैसर्गिक व शुध्द हवा तयार करण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे.
कंपनीचे संचालक सिध्दनाथ ठोकळे म्हणाले की, कोरोनाने आपल्याला चांगलाच धडा शिकविला आहे. भविष्यात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची सोय केली. पण कृत्रिम ऑक्सिजनपेक्षा नैसर्गिक शुध्द हवा आरोग्यास पोषक असते. इनडोअर प्लॅटेशनमुळे ऑक्सिजनचा तुटवडा हा पूर्णपणे संपेल असं नाही. परंतु, काही प्रमाणात याचा उपयोग निश्चित होईल. तसेच या कंपनीच्या प्रयोगामुळे शासनाला योग्य तो हातभार लावू शकतो.