Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात २९ हजार नवे रुग्ण, तर ४४ हजार रुग्णांना डिस्चार्ज
![The third wave of corona came? One and a half lakh corona affected in 5 days in Kerala!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/319718852-corona-1532x900-adobestock-2-1.jpg)
मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ६४४ रुग्णांची वाढ झाली आहे तर आज ४४ हजार ४९३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, गेल्या २४ तासांत ५५५ मृतांची नोंद झाली आहे, आरोग्य विभागाने ही माहिती.
गेल्या २४ तासांत वाढलेल्या नव्या कोरोना रुग्णांमध्ये एकूण बाधितांचा आकडा ५५ लाख २७ ह जार ०९२ वर पोहोचला आहे. यापैकी, ५० लाख ७० हजार ८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. तर आतापर्यंत ८६ हजार ६१८ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. यामुळे सध्या राज्यात ३ लाख ६७ हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.