पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले! जाणून घ्या आजचे दर
![Price hike continues! Petrol-diesel prices go up by 35 paise](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/petrol-diesel-1-696x413-1.jpg)
नवी दिल्ली – मागील दोन महिने इंधनाचे दर स्थिर होते. मात्र ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आजही इंधनाच्या किंमती वाढवल्या आहेत. इंधन तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे दर दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्रमी उंचावर आहेत. त्यातच आजही पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महागले आहेत. त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९२.३४ रुपये इतकी झाली असून डिझेल प्रति लिटर ८२.९५ रुपयांना विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल ९८.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे.
दरम्यान, देशात तेलाच्या दरांमध्ये दररोज सकाळी ६ वाजता बदल केला जातो. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.