गोकुळ दूध संघ निवडणूक: सतेज पाटील यांच्या गटातील चार उमेदवार विजयी
![Satej Patil as Vice President of Indian Fencing Federation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/satej-patil-1.jpg)
कोल्हापूर |
कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्या चुरस बघायला मिळत आहे. मतमोजणी सुरू आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये सतेज पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी करोना संसर्गाचा प्रसार होत असतानाही प्रचाराचा धुरळा उडाला होता.
३ मे रोजी जिल्ह्यातील ७० मतदार केंद्रांवर मतदान पार पडले. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले असून, मतदानासाठी सत्तारूढ आणि विरोधी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शनावर भर दिला होता. आज गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, आतापर्यंत सतेज पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सुजित मिणचेकर यांनी ३४६ मतांनी विजयी मिळविला. तर अमर पाटील यांनी ४३६ मते आणि बयाजी शेळके यांनी २३९ मतांनी विजयी झाले आहेत.
- शौमिका महाडिक विजयी
महिलांच्या सर्वसाधारण गटातून सतेज पाटील यांच्या गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या आहेत. तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक यांनी ४३ मतांनी विजय मिळविला आहे. शौमिका यांच्यानिमित्ताने महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबियातील उमेदवार विजयी झाला आहे. त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. शौमिका यांच्या विजयाबरोबरच महाडिक आघाडीने खातं उघडलं आहे. मात्र, शौमिका यांच्या विजयानंतर विरोधी गटाकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.
गोकुळ दूधसंघातील २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी ३,६५० पात्र सभासद होते, यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सत्ताधारी आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीविरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं आव्हान दिलेलं आहे. २१ पैकी चार पाच जागांचे निकाल हाती आले आहेत.
वाचा- एक वर्षापासून शाळा बंद असताना ‘वॉटर फिल्टर’ खरेदी कशा साठी ?- नाना काटे