प्रभाग 10 मधील विद्युत लाईन भूमिगत करा; नगरसेवक तुषार हिंगे यांची मागणी
पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर भागात भूमीगत विद्युत लाईन टाकण्याची मागणी करूनही महावितरणकडून सहकार्य मिळत नाही. येत्या तीन ते चार दिवसांत विद्युत लाईन भूमीगत करण्याचे काम सुरू नाही झाले तर, प्रभागातील नागरिकांना घेऊन आकुर्डी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक तुषार हिंगे यांनी दिला आहे.
यासंदर्भात हिंगे यांनी आकुर्डी विभागाच्या महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग 10 मधील विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर भागात विद्युत लाईन भूमिगत करण्याची मागणी केली. मात्र, महावितरणच्या कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत अनेकवेळा वरिष्टांकडे तक्रार केली. तरीही, संबंधितांवर कार्यवाही झाली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याची मागणी केली आहे. टाळाटाळ केल्यास प्रभागातील नागरिकांना घेऊन महावितरण आकुर्डी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा हिंगे यांनी दिला आहे.