स्वच्छ सर्वेक्षण अभियान : लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/images-18.jpg)
लोणावळा – स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. नुकताच या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. देशात पहिल्या १० शहरांमध्ये लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एकमेव शहर आहे.
स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेत लोणावळा शहरात स्वच्छतेला सुरुवात झाली. या मोहीमेत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व नागरिक यांनी सक्रिय सहभाग नोंदवत लोणावळा शहरातील प्रत्येक भाग हा स्वच्छ करण्याकरिता प्रयत्न केले. या अभियानाला नागरिकांची साथ मिळाल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही लोणावळेकरांची मोहीम बनली होती. यातच शहरातील चित्रकार मंडळींनी विनामोबदला शहरातील सर्व भिंतींवर आकर्षक चित्र रेखाटत शहराचे रूपडे बदलले. या उपक्रमाला राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी भेट देत मुलांशी संवाद साधला होता. या दोन्ही उपक्रमांना देशात अनुक्रमे पाचवा व दुसरा क्रमांक मिळाला होता.
शहरातील रस्ते किंवा कचराकुंड्या साफ न करता प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आरोग्य विभागाच्या माजी सभापती पूजा गायकवाड, विद्यमान सभापती बिंद्रा गणात्रा आदींनी केले.