संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले….
![Udayan Raje's reaction to Sambhaji Bhide's statement; Said.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Udyanraje-Bhosale-Sambhaji-Bhide.jpg)
मुंबई |
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य केलं आहे. सांगलीत बोलताना संभाजी भिडे यांनी करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं म्हटलं. यावेळी त्यांनी . जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का?,” अशी विचारणाही केली. दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसेल यांना संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उदयनराजे म्हणाले, “माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन”.
संभाजी भिडेंनी काय म्हटलं –
“मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही”.
वाचा- असे आंडू-पांडू खूप आले, संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले