थेरगावमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका
पिंपरी महाईन्यूज
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका स्पा सेंटरवर वाकड पोलिसांनी छापा मारला. त्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे बुधवारी (दि. 7) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
राहूल जाधव (रा. पुणे), गणेश धनावडे आणि एक महिला (वय 19, रा. साने चौक, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी स्पा सेंटर, साई कॉम्प्लेक्स, डांगे चौकाजवळ, थेरगाव येथे तीनही आरोपी तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या. त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवून घेत होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.