#Covid-19: मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
![# Covid-19: Vaccination among Muslims should be accelerated: Health Minister Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Rajesh-Tope.jpg)
पुणे |
देशात सध्या लसीकरण सुरु असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे लसींचा पुरवठा कऱण्याची मागणी केली आहे. तसंच दिवसाला सहा लाख लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर लोकांनाही सहकार्य करण्याची गरज बोलून दाखवली. यावेळी त्यांनी मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे असंही सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“सहा लाखांच टार्गेट पूर्ण करायचं असेल तर लोकांनीही सहकार्य करणं आवश्यक आहे. गावागावात न घाबरता लसीकरण झालं पाहिजे. अनेकांमध्ये गैरसमज असून, काहीजण पसरवत आहे. मुस्लीमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मुस्लीम धर्मगुरू व राजकीय नेत्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे. ते चांगला प्रतिसाद देत आहेत. मुस्लीमांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील व ते ही लसीकरणाला प्रतिसाद देतील ही आशा आहे.
वाचा- “….तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती