Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत एका वर्षांंनंतर शिक्षण समितीची स्थापना ; नऊ नगरसेवकांना सदस्यपदी संधी

पिंपरी –  महापालिका शिक्षण मंडळ 2 जून 2017 रोजी बरखास्त झाल्यानंतर तब्बल एका वर्षांनंतर शिक्षण समिती स्थापना करुन नऊ नगरसेवकांची निवड करण्यात आली. या शिक्षण समितीत नऊ सदस्यामध्ये भाजपाच्या सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर, उषा काळे, राजू बनसोडे आणि शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांना संधी देण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे यांनी शिक्षण समितीत सदस्यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी नवनियुक्त सर्व सदस्यांचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसचिव उल्हास जगताप यांच्या हस्ते पुस्तक देवून अभिनंदन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2 जून 2017 रोजी आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. त्यांच्या अधिपत्याखालील मालमत्ता, कर्मचारीवृंद स्वत:च्या अधिकार कक्षेत घेतले. शिक्षण मंडळाला प्रदान करण्यात आलेले सर्व अधिकार संपुष्टात आणले गेले. त्यानंतर शिक्षण मंडळाच्या जागी नव्याने महापालिकेच्या कायद्यानुसार शिक्षण समितीची स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी देण्यात आली. या समितीवर मंडळाप्रमाणे 15 सदस्यसंख्या घटून विविध विषय समितीप्रमाणे 9 नगरसेवकांची ही समिती आहे.

त्यानुसार भाजपचे 77 संख्याबळानुसार त्यांचे सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे हे पाच नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे तीन नगरसेवक आणि शिवसेनेच्या 9 संख्याबळानुसार अश्विनी चिंचवडे यांची समितीत निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, विधी समितीच्या रिक्त असलेल्या एका जागेवर सागर गवळी तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या रिक्त असलेल्या एका जागेवर कुंदन गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांनी या नगरसेवकांची समितीत निवड झाल्याचे घोषित केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button