पुण्यात एक ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची मागणी; अजित पवारांचा विरोध
!['Pune Lock' from 6 pm to 6 am; Important decision of Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/ajit-pawar-2-1.jpg)
पुणे – वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी अधिकचे निर्बंध की लॉकडाऊन लागणार याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. पुण्यात नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीतमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर प्रशासनाने पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवारांनी यास विरोध केला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी आता केली जाणार आहे. आज एकुण रुग्णसंख्या लक्षणे याचा आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला गेला आहे.
पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशासन करत आहे. तर अजित पवारांसह आयएएस अधिकाऱ्यांनीदेखील यास विरोध केला आहे. यामुळे आणखी कडक निर्बंधांवर चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. यामुळे ही बैठक होत आहे.
रुग्णांना बेड मिळेनात…
पुण्यामध्ये गेले काही सातत्याने रुग्ण संख्या वाढते आहे. त्यातच आता गंभीर रुग्णांना बेड मिळेना अशी परिस्थिती आली आहे. ही एकूण परिस्थती लक्षात घेता अधिकचे निर्बंध किंवा लोकडाऊन याचा विचार सुरु असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. दरम्यान आर्थिक घडी बिघडू नये म्हणून लोकडाऊन नको अशी भूमिका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली जात आहे.