‘मी आता येवल्यात जाऊन..’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा

Manoj Jarange On Chhagan Bhujbal | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलांच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलं. आता दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी जनआक्रोश यात्रा सुरु केली आहे. त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना इशारा देत आपण येवल्यामध्ये येऊन उपोषण करु शकतो, असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे तिकडे येवल्यामध्ये बसले आहेत. आता मी देखील तिकडेच येवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो. छगन भुजबळांनी मराठा समज आणि धनगर समाजामध्ये वाद लावला आहे. मी देखील तिकडे येवल्याकडे आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितली आहे. तिकडे येवल्यात उपोषणाला येतो आणि मग समजेल की उपोषण काय असतं? असा इशारा जरांगेंनी भुजबळ यांना दिला आहे.
हेही वाचा – निष्ठावंत तुषार कामठे- सुलक्षणा धर यांनी ‘करुन दाखवले’ ; साहेबांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये स्थान मिळवले!
अमित शाह आमच्या प्रश्नांकडे कशाला लक्ष घालतील? ते मोठे लोकं आहेत, त्यांना आमची गरज नाही. जे मोठे आहेत त्यांना हे धरुन राहणार आहेत. ते शिर्डीला आले तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं तुम्ही लक्ष घाला ते काहीही बोलले नाहीत. लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत, त्यांचा चेहरा माणसाचा आहे पण आतून कपटाने भरलेले लोक आहे. त्यांचं काही खरं नाही. ते गरीबाला कधीही मोठं करु शकत नाही. त्यांना देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे ती संपवायची आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.





