Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई |

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त असून याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही असंही ते म्हणाले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

“काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “देशात भाजपाप्रणीत एनडीएसमोर काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती.

 वाचा- तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम तत्काळ सुरु करा- खासदार श्रीरंग बारणे

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button