Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा
मुंबई – कोरोनाच्या संसर्गामुळे रखडलेली पोलीस भरती आता लवकरच होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
वाचा :-जळगावात भाजपाने सत्ता गमावली; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा
राज्यात कोरोनामुळे पोलीस भरतीला ब्रेक मिळाला होता. पण आता पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केलंय.





