जागतीक महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा चिंचवडमध्ये सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/IMG-20210317-WA0001.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
मारुती सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित जागर स्त्री शक्तीचा, सन्मान मातृत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये चिंचवडमधील नवनिर्माण काचपत्रा, कष्टकरी संघातील कचरा, सफाई घंटागाडीवरील कचरा संकलनाचे काम करणा-या महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पिंपरी-चिंचवड विभाग उपाध्यक्ष सचिन निंबाळकर यांनी संयोजन केले. प्रभाग 18 मधील महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमात कार्याध्यक्षा पुष्पा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चिंचवड विभाग अध्यक्षा संगिता कोकणे, नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघाच्या सचिव सोनाली कुंजीर आणि अश्विनी गायसमुद्रे, पौर्णिमा भालेकर, भारती कदम, सुवर्णा वाळके, स्वप्नाली आसोले, उषा चिंचवडे आदी उपस्थित होते.
सूवर्णा वाळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले.