पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
![Death threat to Assistant Commissioner of Pune Municipal Corporation, case filed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Pune-muncipal.jpg)
पुणे : पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अतिक्रमण कारवाई केल्याने संदीप कदम यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान रस्त्याचे मध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. यावेळी तेथी नागरिकांनी याला विरोध करत सहायक आयुक्त संदीप कदम यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
आमचं घरं रस्ता रुंदीकरणामध्ये येत नाही, तुम्ही आम्हाला नोटीसही दिली नाही आणि मोबदलाही दिला नाही. तुम्ही आमच्या घराला हातच कसा लावता, असे म्हणत संदीप कदम यांना शिवीगाळ केली. तसेच, संध्याकाळी भेट मग तुम्हाला दाखवतो, अशी धमकी दिली. यावेळी एस.आर.ए. चे अतिरिक्त आयुक्त देखील होते.
दरम्यान, या प्रकरणी जावेद शेख, हसीना शेख आणि चार महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.