दत्तनगरात नेत्र चिकित्सा शिबिराचा शेकडो नागरिकांना लाभ
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
- नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा पुढाकार
पिंपरी / महाईन्यूज
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर परिसरात भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चस्मे वाटप शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये एकूण 627 नागरिकांनी शिबिरातील तपासण्या आणि चष्मे वाटपाचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. उपमहापौर केशव घोळवे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे, भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस राजू दुर्गे, शहर उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेविका कमल घोलप यांची उपस्थिती प्रार्थनिय होती.
शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत. त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना चास्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा एकूण 627 जणांनी लाभ घेतला. शिबिरातील वैद्यकीय कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील व डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टर्स पथकाने मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी विजय शीनकर, दीपाली करंजकर, रुपेश सुपे, वैदही जंजाळे, नंदा करे, अजित भालेराव, मोनाली यादव, संतोष रणसिंग, नेताजी शिंदे, यशवंत दनाने, मनोज कसबे, सोनटक्के, धनंजय जगताप, राकेश ठाकूर, जयश्री वाघमारे, धरम वाघमारे, बाबा इटकर, मिलिंद कांबळे, शेखर साळवे, सुनील शेलार, अविनाश वेताले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.