कात्रज घाटात कचऱ्याच्या ढिगात सापडले बाळ
![14 child deaths in 15 days in Melghat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/baby-foot-Frame-copy-1.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलिस दलातील एका सहायक महिला पोलिस निरिक्षकांच्या तप्तरतेमुळं या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हे बाळ कधीपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतं? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. बाळावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पुण्यात कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात बाळ रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे या दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचल्या. त्या बाळाला सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून रूग्णालयात घेऊन गेल्या. दुचाकीवरून जातानाचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या महिला पोलिस अधिकार्याचे विशेष कौतुक केले जात आहे.