breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार
Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर
![The stock market plunged, the Sensex plunged by a thousand points](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/shear.jpg)
नवी दिल्ली – आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली आहे. आज शेअर बाजार विक्रमी उंचीसह उघडला. आज इंट्रा डेमध्ये सेन्सेक्स 485 अंकांच्या तेजीसह 52110 वर पोहोचला असून निफ्टी 136 अंकांच्या तेजीसह 15300 अंकांवर व्यापार करत आहे. पहिल्यांदा निफ्टीने इतका उच्चांक गाठला आहे.
याआधी सेन्सेक्सने 5 फेब्रुवारी 2021मध्ये 51 हजारांची पातळी पार केली होती. म्हणजे फक्त 10 दिवसांत आणि 7 व्यापार सत्रात 1000 अंकांची कमाई केली आहे. अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कमालीचे बदल झाले आहेत. परिणामी आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.