बहुजन समाज पार्टीतर्फे रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन
![Bahujan Samaj Party, Ramabai Ambedkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/ramabai-abhivadan.jpg)
पुणे | प्रतिनिधी
”बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या हस्ते माता रमाईना हार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व उपस्थित महिला व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्यहार घालून अभिवादन केले.
![लताताई रोकडे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Latatai-Rokade-300x225.jpg)
या वेळी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा सचिव मधुकर इंगळे, शहर उपाध्यक्ष सुनील चटोले, शहर सचिव राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंदकांत सोनवणे, पिंपरी विधानसभा महासचिव सिद्धार्थ वंसाली, ज्येष्ठ बसपा नेते प्रा. बी. व्ही. शिंदे, प्रदीप टोपे, नरेंद्र सोनटक्के, विजय घोडके, राहुल मदणे, नागेश सदावर्ते,सुनील शिखरे, लक्ष्मण शिरसाठ, दगडू जोगदंड, राहुल रामटेके, गौतम निकाळजे, राजू कांबळे, रत्नाकर शिंदे, राजेंद्र लोंढे, तानाजी सरोदे, बालाजी मोरे, शंकर गायकवाड, तसेच महिलामध्ये सायरा शेख, शिल्पा गायकवाड, मनीषा सुरवडे, आदी बहुजन समाज पार्टीचे मिशनरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![कुणाल व्हावळकर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Kunal-Wavhalkar-300x225.jpg)