प्रभाग 26 मधील मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळेत अत्यावश्यक साहित्य वाटप
![DIVISION 26 MADHIL MARUTI GENU KASPETTE PRIMARY ULTIMATE URGENT LITERATURE](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/maruti-genu-school.jpg)
– नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या स्वखर्चातुन उपक्रम
पिंपरी । प्रतिनिधी
प्रभाग 26 मधील मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळेत अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या स्वखर्चाने याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन हे साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती संदीप कस्पटे यांनी दिली.
कोरोना संक्रमण काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सध्या कोरोनाची संख्या कमी होत आहे. रुग्णवाढीचा आलेखही कमी झाला आहे. कोरोनावरील लस निर्मितीमुळे शाळा, महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 4 फेब्रुवारी पासून शाळा पूर्ववत सुरु होणार आहेत.
कोरोना प्रादुर्भाव पासून वाचण्यासाठी शाळेतील मुलांची अतिदक्षता तसेच सुरक्षितता म्हणून नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या स्वखर्चाने अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये दोन ऑक्सिमीटर, एक टेम्परेचर चेक गण, 150 मास्क, एक सॅनिटायजर स्टॅन्ड, एक सॅनिटायजर कॅन्ड, सॅनिटायजर 3 बॉटल कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा क्र 59 मध्ये वाटप करण्यात आले.
नगरसेवक संदीप कस्पटे, कार्यकर्ते यांच्या हस्ते मुख्याधापक तसेच शिक्षक वर्ग यांच्याकडे हे साहित्य सुपुर्त करण्यात आले.