कपिल शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
![New guest arrives at Kapil Sharma's house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/largeimg.jpeg)
मुंबई – कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली असून पहाटे आपल्या बाळाचा जन्म झाल्याचे म्हटले आहे. बाळ आणि आई दोघंही सुखरुप असल्याचं कपिलने ट्विटमध्ये सांगितलं आहे. त्याचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत असून सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी आपण बाळाचा फोटो पाहण्यासाठी आणि नाव जाणून घेण्यात उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
पहाटे ५.३० वाजता कपिल शर्माने ट्विट करत माहिती दिली आहे की, ‘नमस्कार, आज सकाळी आम्हाला मुलगा झाला. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल.’
कपिल आणि पत्नी गिन्नी कुटुंबात नवा सदस्य येणार असल्याचं गुपित ठेवलं होतं. नोव्हेंबर २०२० मध्ये गिन्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत होती. मात्र यासंदर्भात कपिलने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती. तर दुसरीकडे कपिल शर्माची मुलगी १० डिसेंबरला एक वर्षांची झाली असून आता कुटुंबात नवा पाहुणा आला आहे. कपिल आणि गिन्नी डिसेंबर २०१८ साली विवाहबंधनात अडकले होते.