खराडी येथील नियोजित ऑक्सिजन पार्कची आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून पाहणी
![Kharadi Yethil Planned Oxygen Parkchi MLA Sunil Tingray Yanchayakadoon Pahani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/20210125_165506-scaled.jpg)
– अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांचीही उपस्थिती
पुणे : प्रतिनिधी
वडगाव शेरी मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व आमदार सुनिल टिंगरे यांनी खराडी स.नं ३० पिट्टी मैदान येथे “आॅक्सीजन पार्क” विकसीत करण्याकरिता जागेची पाहणी केली. खराडी भागात मोठी लोकसंख्या वाढली आहे. नागरिकांना मुख्यतः जेष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना चांगले उद्यान उपलब्ध नसून या संदर्भात आमदार सुनिल टिंगरे यांनी निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख यांना बजेट मध्ये आर्थिक तरतूद करणे तसेच सीईआर फंडातून उद्यान विकसीत करण्याची मागणी केली होती. याच अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.
या वेळी आमदार सुनिल टिंगरे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, नगरसेवक महेंद्र पठारे, पुणे महानगरपालिका उद्यान अधीक्षक प्रिती सिन्हा, उपायुक्त दहिभाते, नगररोड क्षेत्रिय अधिकारी सुहास जगताप, पुणे मनपा वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद मनोज पाचपुते, उद्यान विभाचे रुद्रके, रंदिवे, वायसे व इतर अधिकारी उपस्थित होते.
संबंधित साडे सात एकर पिट्टी मैदानामध्ये भव्य १ किलो मीटरचा जाॅगिंग ट्रक, पुण्यात प्रथमतः मेज गार्डन, योगासनासाठी वेगळा भाग, लहान मुलांना वेगळी खेळणीपट व तसेच या उद्यानामध्ये जासतीत जास्त आॅक्सीजन मिळणारी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. एका भागात पुर्णपणे आयुर्वेदिक वनस्पतीची रोपे व झाडे लावण्यात येणार आहेत. विविध प्रकारची फुले व एका भागात चाफा गार्डन ही विकसीत करण्यात येणार आहे. हे उद्यान नदीच्या जवळ असल्याने स्थाळांतरीत पक्षी व स्थानिक पक्षांसाठी अदिवास निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड कली जाणार आहे.
या वेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी खराडी स.नं ६६ येथील उद्यानाची जागा पाहणी केली. या स.नं ६६ मधील उद्यान विकसीत करण्याकरिता सीईआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुनिल टिंगरे यांच्याशी चर्चा करण्यात आली.