Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुलाबा किल्ल्याच्या संवर्धनास पुरातत्व विभागाची मंजुरी

अलिबाग-अलिबागच्या कुलाबा किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने 30 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांनी आज दिली. केंद्रीय पुरातत्व विभागाने मंजुरीचे पत्र रघुजी राजे यांना दिले. त्यामुळे कुलाबा किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

कुलाबा किल्ल्याची झालेल्या दुरावस्थेबाबत रघुजीराजे आंग्रे यांनी मुंबईमध्ये केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री प्रल्हादसिह पटेल यांची भेट घेतली. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनबाबत पटेल यांच्याशी चर्चा करून कुलाबा किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विनंती केली. चर्चा सकारात्मक झाल्यानंतर पटेल यांनी त्वरित किल्ल्याच्या जतन आणि सवर्धनसाठी निधीची मंजुरी दिली. त्याबाबतचे पत्र 15 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी रघुजीराजे आंग्रे याना पाठविले. किल्ल्यातील कामाबाबत निविदा प्रक्रियाही सुरू केल्याचे रघुजी राजे आंग्रे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button