शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या ‘त्या’ गावात भाजपचा विजय- चंद्रकांत पाटील
मुंबई |
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होणारा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. प्रत्येक पक्ष विजयाची दावेदारी करत असला तरी काही ठराविक ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालांची सध्या राज्यात चर्चा आहे. यात चंद्रकांत पाटलांचे गाव खानापूरचा देखील समावेश आहे. मात्र खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, असे म्हणत पराभवाचा दावा फेटाळून लावलेला आहे. भाजप 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत बहुमत मिळवेल, असा दावा देखील त्यांनी केला.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दत्तक घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील येनकुल ग्रामपंचायतीतही भाजपचा विजय झाल्याचा दावा केला आहे. एकनाथ खडसे यांच्या कोथळी गावातील ग्रामपंचायत भाजपने जिंकलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दत्तक घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील येनकुल ग्रामपंचायतीतही भाजपाने विजय मिळवला आहे. खासदार विनायक राऊत यांनी दत्तक घेतलेल्या देवगड तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीवरही भाजपाचा झेंडा फडकलेला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले असल्याचे ते म्हणाले आहेत.
वाचा- जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात





