शिवसेना खासदार विनायक राऊतांचा राणेंबद्दल खळबळजनक दावा, म्हणाले…
![Vinayak Raut warns Narayan Rane, Nilesh Rane says we can open this case again and then...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Vinayak-Raut-welcomes-nitesh-rane-demand.jpg)
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबाबद्दल खळबळजनक दावा केला आहे. भाजप नेते नितेश राणेंनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला असून, यामुळे त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकणार होते, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नितेश राणेंनी नवी मुंबईतील एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला, यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
नारायण राणे भाजपला शरण आल्याने ही केस बंद झाली. आम्ही मनात आणले तर ही केस लगेच ओपन करू शकतो. केस ओपन झाले तर राणे लगेच तुरुंगात जातील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते, असा दावा देखील विनायक राऊत यांनी केला आहे.