१५ जानेवारीला कॉंग्रेसचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे मागे घेण्याची मागणी कायम
![On January 15, the Congress laid siege to the Raj Bhavan and demanded repeal of the Agriculture Act](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/randeep-surjewala.jpeg)
नवी दिल्ली – १ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला मात्र अजूनही राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या मात्र कोणताही तोडगा अद्याप निघाला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होत नसल्याने कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ जानेवारीला शेतकरी अधिकार दिनानिमित्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी कॉंग्रेसकडून राजभवनाला घेराव घालण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
वाचा :-Corona Vaccination: पहिल्यांदा ‘या’ तीन कोटी लोकांनाच कोरोना लस देणार
मोदी सरकारला जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी सोडून जावे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने या आधीही शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे १५ जानेवारीला कॉंग्रेस राजभवनाला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे १५ जानेवारीला राजभवन परिसरात घेराव घालण्याचा परिणाम शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी होणार का हे पाहावे लागणार आहे.