Breaking-newsमनोरंजन
शिर्षासनानंतर अनुष्काचा ट्रे़डमीलवरचा व्हिडीओ व्हायरल
![Anushka's video on the treadmill goes viral after the summit](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/anushka-sharma.jpg)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का सध्या तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून या काळातील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी बेबीबंपसोबत शीर्षासन करतानाच तिचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यात अनुष्का ट्रेड मीलवर चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनुष्काच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.
अनुष्का शर्मा लवकरच तिच्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती तिच्या प्रेग्नंसीमुळे सातत्याने चर्चेत आहे. गरोदरपणातही अनुष्का फिटनेसकडे लक्ष देतेय. शीर्षासनाच्या फोटोसोबतच तिने अलिकडे VOGUE INDIA साठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. यात अनुष्का तिच्या बेबी बंपसोबत बोल्ड लूकमध्ये दिसून आली होती.