काँग्रेसच्या आरोपांवर सेनेचं चोख उत्तर, म्हणाले…
![Shivsena answers congress allegations firmly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Shivsena-answers-congress-allegations-firmly.png)
सत्तेत आल्यानंतर सध्या महाविकासआघाडी सरकरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी घडत आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे न राहता भाजपकडे जावं यासाठी खुद्द शिवसेना प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेमुळेच काँग्रेसला मिळाले आहे, हे लक्षात ठेवावे, असा इशारा दिला आहे. शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
यशवंत जाधव म्हणाले की, रवी राजा यांनी जरी शिवसेनेवर आरोप केले असतील, तरी त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालंय. शिवसेनेने सहकार्य केले नसतं तर त्यांना हे पद मिळालं नसतं. पण ते आज असे का बोलतायत माहीत नाही.
महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होईल का ? याविषयी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना अशा धमक्यांना घाबरत नाही. महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं काही मला वाटत नाही. छोटे मोठे मतभेद बसून सोडवले जातील. काँग्रेसने उगाच राईचा पर्वत करून नये, असेही ते म्हणाले.