breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविड 19 लसीसाठी आरोग्य सेवा कर्मचारी संघटनांनी नोंद करावी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरी / महाईन्यूज

कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -१९ लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड १९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यांची माहिती अहवाल (डाटाबेस) संकलन करण्याचे काम सुरु आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड-१९ प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-१९ प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामधील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक, इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (NIMA),पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन (PCDA), दंततज्ञ संघटना, पॅथोलॉजिस्ट संघटना, नर्सेस असोशिएशन, फार्मासिस्ट असोशिएशन यांचेकडून कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर भरणेकामी आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरी पिंपरी-चिंचवड महापालिका, वैद्यकिय विभागाकडून पुनश्च: आवाहन करण्यात येते की, ज्या संस्थांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांनी कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर तातडीने दोन दिवसात करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button